बुधवार, ४ जून, २०१४

क्रांतिवीर खाज्या नाईक....!!!

खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. तेसेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे सजा देण्यात आली.१८५५ ला  शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे आशी विनंती त्यांनी सरकारला केली,परंतु ती बाद झाली पण १८५७ साली वातावरण तापू लागले तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. ते दिल्लीच्या बादशहाच्या संपर्कात होते व सूचना मिळताच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक होते, त्यांनी ७००-८०० भिल्लांना जमा करून गावच्या गावे लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल्ल येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर काब्ज्जा करून ब्रिटीशांच्या एवजी स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली.   
            
                 होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेली खंडणी मुंबईला जात होती ती खाज्या नाईकांनी लुटली ती जवळ जवळ ७००००० रुपये होती, व त्याचे रक्षण ३०० सैनिक करीत होते पण त्यांनी खाज्यांना किंवा त्यांच्या कोणत्याही भिल्ल सैनिकाला विरोध केला नाही. एवढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली.
                खाज्या नाईकांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक हि येऊन मिळाले, अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले काळूबाबा नाईक ही आता खाज्यांना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य ही आता खाज्यांना येऊन मिळाले. आता भिल्ल सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, "सुलतानपुरच्या" भिल्ल सेनेने " सारंगखेडा " गावावर हल्ला चढविला व ब्रिटिशांना सडो कि पडो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते.
                आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरु केलेले होते. जिल्ह्यात सैनिकांच्या  पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकीही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर भिल्लांशी लढण्या साठी भिल्लाचेच बांधव असलेले महदेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. आता भिल्लांना जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्स ला खाज्या व त्याचे ३००० साथीदार हे बडवानी च्या जवळ आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी भिल्लांना घेराव टाकला. पण जर शरण येतील ते भिल्ल कसले त्यांनी जवळ असलेल्या दगडांच्या व भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रीतीशांच्या तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व १६ सैनिक मारले. भिल्लांची खूप हानी झाली. ४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा " पोलाद्सिंग" हा 'शहीद' झाला. पकडलेल्या कैद्यान्पाकी ५५ कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून मारण्यात आले.
             आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुळ्याच्या कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले. हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ ला शिरपूर लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल्ल होते. १७/११/१८५७ साली परत खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७००००० चा ब्रिटीशांचा खजिना लुटला.
              दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह १५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात   ६५ लोक मारले गेले.  खाज्या नैकांसाहित ५७ लोकांना ड्रमच्या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लात्कावण्यात आले कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील " आम्बापानीची लढाई " म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते, हे फार मोठी शोकांकिका आहे कि आजच्या आदिवासी तरुणाला " खाज्या नाईकांचे " नाव ही माहित नाही, त्यांच्या बलिदानाचे महत्व तर खूप दूरची गोष्ट आहे.

जननायक टंट्या मामा भील .....!!!

खंडवा जिले की पंधाना तहसील के बडदा में 1842 में भाऊसिंह के यहाँ एक बालक ने जन्म लिया, जो अन्य बच्चो से दुबला-पतला था | निमाड में ज्वार के पौधे को सूखने के बाद लंबा, ऊँचा, पतला होने पर ‘तंटा’ कहते है इसीलिए ‘टंट्या’ कहकर पुकारा जाने लगा |
टंट्या की माँ बचपन में उसे अकेला छोड़कर स्वर्ग सिधार गई | भाऊसिंह ने बच्चे के लालन-पालन के लिए दूसरी शादी भी नहीं की | पिता ने टंट्या को लाठी-गोफन व तीर-कमान चलाने का प्रशिक्षण दिया | टंट्या ने धर्नुविद्या में दक्षता हासिल कर ली, लाठी चलाने और गोफन कला में भी महारत प्राप्त कर ली | युवावस्था में उसे पारिवारिक बंधनों में बांध दिया गया | कागजबाई से उनका विवाह कराकर पिता ने खेती-बाड़ी की जिम्मेदारी उसे सौप दी | टंट्या की आयु तीस बरस की हो चली थी, वह गाँव में सबका दुलारा था, युवाओ का अघोषित नायक था | उसका व्यवहार कुशलता और विन्रमता ने उसे लोकप्रिय बना दिया |

बंजर भूमि में फसल वर्षा पर निर्भर होती है | प्राकृतिक प्रकोप, अवर्षा से बुरे दिन भी देखना पड़ते है | अन्नदाता किसान भी भूखा रहने को मजबूर हो जाता है | टंट्या को भी ऐसी स्थिति का सामना करना पड़ा | पिता भी ऐसे समय नहीं रहे, भूमि का चार वर्ष का लगान भी बकाया हो गया | मालगुजार ने उसे भूमि से बेदखल कर दिया | आपके सम्मुख खाने की दिक्कत हो गयी  | ऐसे वक्त उसे ‘पोखर’ की याद आई जहा उनके पिता भऊसिंह के मित्र शिवा पाटिल रहते थे और जिन्होंने सम्मिलित रूप से जमीन खरीदी थी, जिसकी देखरेख शिवा पाटिल करते थे | शिवा पाटिल ने टंट्या का आदर-सत्कार तो किया परन्तु भूमि पर उसके अधिकार को मंजूर नहीं किया | शिवा के मुकरने के बाद टंट्या बडदा पंहुचा | मकान, बेलगाडी बेचकर कुछ नकद राशि जुटाई | खंडवा न्यायालय में शिवा की धोखाधड़ी के खिलाफ कार्यवाही की, इसमें भी आपको पराजित होना पड़ा | झूठे साक्ष्यो के आधार पर शिवा की विजय हुई |

टंट्या ने रोद्र रूप धारण कर लिया | लाठी से शिवा के नौकरों की पिटाई करके खेत पर कब्ज़ा कर लिया | उसने पुलिस में टंट्या के खिलाफ शिकायत दर्ज कराई | पुलिस ने गिरफ्तार करके मुकदमा कायम किया, जिसमे उसे एक वर्ष के कठोर कारावास की सजा सुनाई गयी | जेल में बंदियों के साथ अमानुषिक व्यवहार होता देख टंट्या विक्षुब्ध हो गया, उसके मन में विद्रोह की भावना बलवती होने लगी| जेल से छूटने के बाद पोखर में मजदूरी करके जीवन निर्वाह करने लगा, किन्तु वहा भी उसे चैन से जीने नहीं दिया गया | कोई भी घटना घटती तो टंट्या को उसमे फसा देने षड्यंत्र रचा जाता | पोखर के बजाय उसने हीरापुर में अपना डेरा जमाया, वहा चोरी के आरोप में गिरफ्तार कर लिया गया | बिजानिया भील और टंट्या ने तलवार से कई सिपाहियों को घायल कर दिया, इस प्रकरण में उसे तीन माह की सजा हुई | बडदा-पोखर के बाद झिरन्या गाँव (खरगोन) में टंट्या रहने लगा | एक अपराधी ने चोरी के मामले में उसका नाम ले लिया, फिर से पुलिस उसे खोजने लगी | टंट्या ने बदला लेने का संकल्प लिया, उसने साहुकारो-मालगुजारो से पीड़ित लोगो का गिरोह बनाया जो लूटपाट और डाका डालता था | 30 जून, 1876 को हिम्मतसिंह जमीदार के यहाँ धावा बोला गया, हिम्मतसिंह को गोली मार दी गई | टंट्या को षडयंत्र में फसाकर उसके विश्वासपात्र साथियों के साथ गिरफ्तार करवा दिया गया| 20 नवम्बर, 1878 को खंडवा की अदालत में दौलिया और बिजौनिया के साथ पेश किया गया |


टंट्या की शोहरत उस समय बुलंदी पर थी, उसे देखने के लिए सैकडो भील जमा हो गए | हिम्मत पटेल ने टंट्या के खिलाफ गवाही दी, जिसे कोर्ट में टंट्या ने धमकाया | उसे खंडवा जेल में रखा गया, जहा से उसने फरार होने की योजना बनाई | 24 नवम्बर, 1878 की रात में बीस फीट ऊँची दीवार फांदकर वह 12 साथियों के साथ जंगल की दिशा में भाग गया |

टंट्या एक गाँव से दूसरे गाँव घूमता रहा | लोगो के सुख-दुःख में सहयोगी बनने लगा | गरीबो की सहायता करना, गरीब कन्याओ की शादी कराना, निर्धन व असहाय लोगो की मदद करने से ‘टंट्या मामा’ सबका प्रिय बन गया | वह शोषित-पीड़ित भीलो का रहनुमा बन गया, उसकी पूजा होने लगी |

राजा की तरह उसका सम्मान होने लगा | सेवा और परोपकार की भावना में उसे ‘जननायक’ बना दिया | उसकी शक्ति निरंतर बढ़ने लगी | युवाओ को उसने संगठित करना शुरू कर दिया | टंट्या का नाम सुनकर साहूकार कांपने लगे |

पुलिस ने टंट्या को गिरफ्तार करने के लिए विशेष दस्ता बनाया, जिसमे दक्ष पुलिस वालो को रखा गया | ‘टंट्या पुलिस’ ने कई जगह छापे मारे, किन्तु टंट्या पकड़ में नहीं आया | सन 1880 में टंट्या ने अंग्रेजी हुकूमत को हिला दिया, जब उसने चौबीस गाँवों में डाके डाले, भिन्न-भिन्न दिशाओं और गाँवों में डाके डाले जाने से टंट्या की प्रसिद्धि चमत्कारी महापुरुष की तरह हो गई |

डाके से प्राप्त जेवर, अनाज, कपडे वह गरीबो को दे देता था | पुलिस ने टंट्या के गिरोह को खत्म करने के लिए उसके सहयोगी बिजानिया को पकडकर फांसी दे दी, जिससे टंट्या की ताकत घट गयी |

टंट्या को गिरफ्तार करने के लिए इश्तिहार छापे गए, जिसमे इनाम घोषित किया गया | टंट्या को पकडने के लिए इंग्लेंड से आए नामी पुलिस अफसर की नाक टंट्या ने काट दी | सन 1888 में टंट्या पुलिस और मालवा भील करपस भूपाल पल्टन ने उसके विरुद्ध सयुक्त अभियान चलाया | टंट्या का प्रभाव मध्यप्रांत, सी-पी क्षेत्र, खानदेश, होशंगाबाद, बैतुल, महाराष्ट्र के पर्वतीय क्षेत्रो के अलावा मालवा के पथरी क्षेत्र तक फ़ैल गया | टंट्या ने अकाल से पीड़ित लोगो को सरकारी रेलगाड़ी से ले जाया जा रहा अनाज लूटकर बटवाया | टंट्या मामा के रहते कोई गरीब भूखा नहीं सोयेगा, यह विश्वास भीलो में पैदा हो गया था |

टंट्या ने अपने बागी जीवन में लगभग चार सौ डाके डाले और लुट का माल हजारों परिवारों में वितरित किया | टंट्या अनावश्यक हत्या का प्रबल विरोधी था | जो विश्वासघात करते थे, उनकी नाक काटकर दंड देता था | टंट्या का कोप से कुपित अंग्रेजो और होलकर सरकार ने निमाड में विशेष अधिकारियो को पदस्थ किया | जाबाज, बहादुर साथियों-बिजानिया, दौलिया, मोडिया, हिरिया के न रहने से टंट्या का गिरोह कमजोर हो गया |

पुलिस द्वारा चारो तरफ से उसकी घेराबंदी की गई | भूखे-प्यासे रहकर उसे जंगलो में भागना पड़ा | कई दिनों तक उसे अन्न का एक दाना भी नहीं मिला | जंगली फलो से गुजर करना पड़ा | टंट्या ने इस स्थिति से उबरने के लिए बनेर के गणपतसिंह से संपर्क साधा जिसने उसकी मुलाकात मेजर ईश्वरी प्रसाद से पातालपानी (महू) के जंगल में कराई, किन्तु कोई बात नहीं बनी |

11 अगस्त, 1896 को श्रावणमास की पूर्णिमा के पावन पर्व पर जिस दिन रक्षाबंधन मनाया जाता है, गणपत ने अपनी पत्नी से राखी बंधवाने का टंट्या से आग्रह किया | टंट्या अपने छह साथियों के साथ गणपत के घर बनेर गया | आवभगत करके गणपत साथियों को आँगन में बैठाकर टंट्या को घर में ले गया, जहा पहले से ही मौजूद सिपाहियों ने निहत्थे टंट्या को दबोच लिया | खतरे का आभास पाकर साथी गोलिया चलाकर जंगल में भाग गए | टंट्या को हथकड़ीयो और बेड़ियों में जकड दिया गया | कड़े पहरे में उसे खंडवा से इंदौर होते हुए जबलपुर भेजा गया | जहा-जहा टंट्या को ले जाया गया, उसे देखने के लिए अपार जनसमूह उमडा | 19 अक्टूम्बर, 1889 को टंट्या को फांसी की सजा सुनाई गयी |

1857 की क्रांति के बाद टंट्या भील अंग्रेजो को चुनौती देने वाला ऐसा जननायक था, जिसने अंग्रेजी सत्ता को ललकारा | पीडितो-शोषितों का यह मसीहा मालवा-निमाड में लोक देवता की तरह आराध्य बना, जिसकी बहादुरी के किस्से हजारों लोगो की जुबान पर थे | बारह वर्षों तक भीलो के एकछत्र सेनानायक टंट्या के कारनामे उस वक्त के अखबारों की सुर्खिया होते थे | गरीबो को जुल्म से बचाने वाले जननायक टंट्या का शव उसके परिजनों को सौपने से भी अंग्रेज डरते थे | टंट्या को फांसी दी गयी या गोली मारी गई, इसका कोई सरकारी प्रमाण नहीं है, किन्तु जनश्रुति है कि पातालपानी के जंगल में उसे गोली मारकर फेक दिया गया था | जहा पर इस ‘वीर पुरुष’ की समाधि बनी हुई है वहा से गुजरने वाली ट्रेन रूककर सलामी देती है | सैकडो वर्षों बाद भी ‘टंट्या भील’ का नाम श्रद्धा से लिया जाता है | अंग्रेजी सत्ता के खिलाफ बगावत करने वाले टंट्या का नाम इतिहास के पृष्ठों में स्वर्णाक्षरो से अंकित है |

जय आदिवासी भील नायक टंट्या मामा की ....!!!

शुक्रवार, ७ मार्च, २०१४

गौरवशाली इतिहासाचा वारसा --धुळे-नंदुरबार

प्राचीन काळापासून हा प्रदेश शेती, विद्या, कला, उद्योगधंदे या दृष्टीने संप होता. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात. लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व 230 च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याच्याच काळात महाराष्ट्रात इतिहासाचा नवा अध्यास सुरू झाला. स्थापत्य कला, नृत्य, संगीत, विणकाम, चित्रकला या क्षेत्रांत प्रगती साधली गेली. व्यापार उद्योगास उत्तेजन मिळाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले.
महाराष्ट्रातील उत्तरेकडे असलेल्या अविकसित धुळे जिल्ह्यास पुरातन काळापासून फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथील संस्कृती भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, राजकीय परिस्थिती तसेच अतिप्राचीन वस्तिस्थळे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, गढ्या, पायविहिरी अभिनव जल व्यवस्थापन, प्रासादिक वास्तू, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक स्थळे, कोरीव लेण्या या सर्व गोष्टींचा भव्य ऐतिहासिक वारसा या जिल्ह्यास लाभला आहे. ही सर्व साधने पर्यटनाच्या, संशोधनाच्या व अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. येथील सर्व संसाधनांचा व पायाभूत सोयीसुविधांचा कालपद्धती व नियोजनपूर्वक विकास साधला, तर धुळे जिल्हा महाराष्ट्राचे नव्हे तर जगाच्या अभ्यासकांचे, पर्यटकांचे लक्ष वेधून घेईल, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
इंडियन अर्किऑलॉजी-ए-रिव्हियू 1953 ते 54 महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन या पुस्तकातील यादीच्या आधारे खानदेशात (धुळे, नंदुरबार) जिल्ह्यातील 30/40 हजार वर्षांपासून गावांनी अतिप्राचीन वैभवशाली इतिहास आपल्या उदरात साठवून ठेवला आहे.
तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा उत्खननीय पुराव्यावरून शोध लागला. खानदेशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सावळदा (शिरपुरा-धुळे मार्गावर) येथे उत्तर हरप्पन काळात संस्कृती विकसित झाली ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ. स. पूर्व 2200 ते 1800) उदयास आली. खानदेशात एका स्वतंत्र संस्कृतीचा त्याकाळात उदय झाला. असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबार भागास लाभला आहे.
उत्तर हरप्पन संस्कृती 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी येथेच विकसित झाली. त्या पुरातत्त्वीय संस्कृतीचे अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले. खानदेशात 200च्या वर प्राचीन संस्कृतीची स्थाने (साईट) पुरातत्त्वीय संशोधकांना मिळाल्यास 100च्या वर स्थाने (साईट) धुळे जिल्ह्यात मिळाल्या. प्राचीन काळापासूनची ऐतिहासिक वारशांची परंपरा आपणास लाभलेली आहे.
साक्री भाडणे येथील अश्मयुगीन हत्यार आजही मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात प्रथमदर्शनी भागात काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेले आहे. हा आपला अनमोल ऐतिहासिक वारसा जगापुढे दर्शनासाठी ठेवला आहे. हे धुळेवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
इ. स. पूर्व 1400 ते 1000 जार्वे संस्कृतीकालीन अवशेष (अक्कलपाडा) चिंचखेडा येथे मातीची भांडी, खापरे व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृद्ध संस्कृती नांदत होती.
धुळ्यापासून 50 कि.मी. अंतरावर असलेले अभीरकालीन किल्ला, भामेर (भंमगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारतकालीन राजा युवनाश्न हा पावसाळ्यात येथे वास्तव्य करून राहत होता. त्याची उपराजधानी भामेर येथे होती.
मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. भामेर किल्ल्यापासून एक मार्ग धुळ्यास पुढे नागपूर, आग"ा असा, एक मार्ग सुरत-भडोच, एक मार्ग नंदुरबार असा जातो. प्राचीन काळापासून या व्यापारी मार्गावरच (साईवाह पथ) लेण्या कोरल्या गेल्यात. येथे जैन लेण्या आजही प्राचीन ऐतिहासिक कलेचा वारसा टिकवून आहेत. यादवकालीन लक्ष्मीदेव या राज्याचे राज्य या भागावर होते. तसा शिलालेख आजही येथे गतस्मृतीचा उजाळा देत आहे. या किल्ल्यातील पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. आजही येथे 128 पाण्याच्या टाक्या डोंगराच्या कडेकपारीत कोरलेल्या आहेत. गत संस्कृतीच्या पाऊलखुणा, भग्न, भव्य दरवाजे, कोरीव खांब, उद्‌ध्वस्त वाडे वैभवशाली ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात.
धुळ्याच्या ईशान्येला 57 कि. मी. अंतरावर तापी नदीच्या उत्तर तिरावर मध्ययुगीन कालखंडातील खान्देशच्या राजधानीचे गाव म्हणजे थाळनेर, प्राचीन, मध्ययुगीन काळापासून समृद्ध असलेला हा निसर्गरम्य परिसर. 14 व्या शतकात फारुकींनी येथे राज्य स्थापून आपली प्रथम राजधानी येथेच निर्माण केली.
पुरातत्त्वीय उत्खननावरून प्राचीन काळापासून येथे वस्ती होती. थाळनेरला प्राचीन ऐतिहासिक वारशाचे अस्सल पुरावे मिळाले आहेत. कुंभकर्णीवंशीय भानुषेण राज्याच्या काळातील कार्तिक शुद्ध पंचमी इ. स. 330 मधील ताम्रपट येथे सापडला. संवत 447 वैशाख शुद्ध पौर्णिमा चालुक्यवंशीय राजाचा ताम"पट सापडला. थाळनेर परिसर समृद्ध व संप असल्याने विविध राजवटींनी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली.
थाळनेरचा किल्ला - तापीकाठी भक्कम व अभेद्य असा किल्ला 13व्या शतकात यादव राजांनी बांधला. किल्ल्यास 6 बुरूज व 7 दरवाजे होते. त्यापैकी दोन बुरूज व दोन पडके भव्य दरवाजे प्राचीन इतिहासाची साक्ष देत पडक्या अवस्थेत उभे आहेत.
मध्ययुगात थाळनेर हे मोठे व्यापारी केंद्र होते. 1660 मध्ये परदेशी प्रवासी टॅर्विनियर येथून गेला तो म्हणतो, सुरत-बऱ्हाणपूर मार्गावरील थाळनेर हे प्रमुख व्यापार केंद्र होते. मराठे काळात येथील व्यापारी पेढ्यांच्या हुंड्या पुणे-वाराणसी-बऱ्हाणपूर येथे जात. थाळनेरला आर्थिक व्यापारी संपतेचाही ऐतिहासिक वारसा लाभला होता.
थाळनेरचे हाजिरे (गोलघुमट) 
खान्देशच्या मध्ययुगीन वास्तुशास्त्राचे वैभव संपतेचे दर्शन घडविणारे हे हाजिरे मशिदीच्या आकाराचे, तर काही मंदिराच्या आकाराचे हिंदू-मोगल व फारुकी वास्तुशास्त्राचा संगम घडविणारे हे महाराष्ट्र नव्हे तर भारतातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक वारशेच म्हटले पाहिजे. येथील फारशी भाषेतील शिलालेख, स्थापत्य, शिल्पकाम व रंगकाम तत्कालीन खान्देशातील कलेची साक्ष देतात. आजही परदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक येथे येतात. धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशात सोनगीर, लळिंग, रायकोट या गिरीदुर्गाचे महत्त्वाचे स्थान आहे.
मध्ययुगीन स्थापत्य शैलीत हेमांडपंथी स्थापत्य शैली महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण आहे. धुळे जिल्ह्यातील त्या शैलीचे मंदिरे बळसाणे, मेथी, जोगशिलू, भोनगाव, दराणे, इंदवे या ठिकाणी आहेत. या मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून त्या भागाची आर्थिक व वास्तू समृद्धी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीची जाण आपणास होते. तेथील ऐतिहासिक वारसा हा जोपासण्यासारखा आहे.
धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशात येथील धार्मिक सण, उत्सव, रथयात्रा, यात्रा, कुलदेवता पूजन हे महत्त्वपूर्ण आहे.
रथयात्रा- भारतात प्राचीन काळापासून रथयात्रा महत्त्वपूर्ण धार्मिक महत्त्व आहे. धुळे जिल्ह्यात रथयात्रांना 200/300 वर्षांचा इतिहास आहे. धुळे, सोनगीर, शिरपूर, सिंदखेडा, बेटावद, कासारे इत्यादी. यात बालाजीचा रथोत्सव 10 ते 15 दिवस चालतो. यातच धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक एकता साधण्याचा प्रयत्न होतो.
कुलदेवता- धुळे जिल्ह्यास प्राचीन वस्तिस्थाने असल्याने अनेक प्राचीन वस्तिस्थानाच्या ठिकाणी कुलदेवतांची स्थाने निर्माण झालीत. त्यांना हजारो वर्षांचा ऐतिहासिक धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. धुळे-एकवीरा देवी, कोकले-नागाई माता, चिंचखेडा-म्हाळसा माता, म्हसदी-धनदाई देवी, झिरणीपाडा-धनाई पुनाई माता, कासारे-कानबाई माता, निजामपूर-म्हसाई माता.
अभिनव जल व्यवस्थापन सिंचन पद्धत (फड पद्धत) 
धुळे जिल्ह्यात साक"ी तालुक्यात जी जलव्यवस्थापनाचे अभिनव सिंचन पद्धत आहे. ती जगातील ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. हे धुळे जिल्ह्याचे भाग्यच मानावे लागेल. आजमितीस नष्ट होण्याच्या अवस्थेत आली आहे.
रामायण, महाभारत काळापासून आजतागायत तो चालू आहे. नासा येथील अभ्यासक डॉ. पियानो यांच्या अभ्यासावरून खान्देशचा (धुळे जिल्ह्याचा) भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार 66 लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही 10 लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. धुळे जिल्ह्यास पांझरा, कान या नद्यांवर बंधारे बांधून त्या पाण्यावर अभिनव जलसिंचन व्यवस्था प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे.
प्राचीन काळापासून हा प्रदेश शेती, विद्या, कला, उद्योगधंदे या दृष्टीने संप होता. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात.
लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व 230 च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याच्याच काळात महाराष्ट्रात इतिहासाचा नवा अध्यास सुरू झाला. स्थापत्य कला, नृत्य, संगीत, विणकाम, चित्रकला या क्षेत्रांत प्रगती साधली गेली. व्यापार उद्योगास उत्तेजन मिळाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले. सुरत-बऱ्हाणपूर सुरत-नागपूर, नागपूर-आगा इत्यादी मार्ग.
इ.स. 240 ते 419 पर्यंत अभिरांनी या प्रदेशावर राज्य केले. खान्देश प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. याबद्दल प्रो. गि"यर्सन, प्रो. के. एम. मुन्शी, टौलेमी, डॉ. बेवर, श्री. वैद्य यांनी विविध मते मांडली आहेत. मार्कें डेय पुराणात अभिरांची दक्षिण देशाचे रहिवाशी म्हटले आहे. नाशिकजवळील अंजनेरी अभिरांची राजधानी होय.
अहिरणी भाषाही महाराष्ट्र संस्कृतीला अहिरांनी दिलेली मोठी देणगी होय. अभिरांची किंवा अहिरांची बोली ती अहिराणी हा सिद्धांत सर्व संशोधक मान्य करतात. अहिराणी ही मौखिक बोली धुळे-नंदुरबार जिल्ह्यात 50/60 टक्के भागात आजही बोलली जाते. या अहिरांचा उल्लेख महाभारतातही आला आहे.
अभिरांनंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, यादव राजवटींनी येथे सत्ता प्रस्थापित केली. विविध कालखंडातील ताम"पट, शिलालेख सापडले आहेत. धुळे, तोरखेडा, तळोदे बेटावर पिंपळनेर, कासारे, थाळनेर इत्यादी ठिकाणी ताम"पट सापडले आहेत.
यादवांनी सुमारे 300 वर्षे खान्देशावर वर्चस्व निर्माण केले. या काळात आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन स्थापत्य, कला व उद्योगक्षेत्रात प्रगती झाली. या काळात जैन धर्मीयांचा प्रभाव वाढला. मांगी-तुंगी, भामेर येथे जैन लेण्या कोरल्या गेल्यात.
16/17 व्या शतकात मुस्लिम सत्ताधीशांनी या संप प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला व आपली सत्ता प्रस्थापित केली.
अनेक परकीय प्रवाशांना प्रवास वर्णनात येथील समृद्धीची व संपतेची माहिती मिळते. 14व्या शतकात आफ्रीकन प्रवासी इब्न बतुता प्रकाशा-नंदुरबार-सोनगीर या भागांतून औरंगाबादला गेला. त्याने या भागातील संपतेची माहिती आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. शिवकाळात न्यू बेरी 1585-1601 हा युरोपीयन प्रवासी येथून गेला. त्याने कापूस, धान्य विपुल होते. तसेच ऊस व गुळाचे उत्पादन भरपूर होते. 1601 मध्ये सलबॅक 1609 मध्ये हॉकिन्स हा धुळे जिल्ह्यातून गेला. त्यांनी आपल्या प्रवास वर्षातून आर्थिक संपतेची माहिती दिली आहे. टॅव्हेनियर, मार्टिन, मॉरीस यांनीही धुळे-नंदुरबारविषयी माहिती लिहिली आहे. फ्रेंच प्रवासी थॅवेनो हा शिवकाळत सुरत-औरंगाबाद मार्गे नवापूर, कोंडाईबारी-दहिवे-पिंपळनेर मार्गे गेला त्याने या भागाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची माहिती आपल्या प्रवास वर्णनात दिली आहे. या परदेशी प्रवाशांच्या प्रवास वृत्तांतावरून या जिल्ह्याची खरी अस्सल माहिती मिळते. पूर्व वैभवाची कल्पना येते. हा भाग सतत पुढे उपेक्षित राहिला. त्याची उपेक्षा राजकर्त्यांकडून तसेच विद्वानांकडूनही झाली.
मराठे कालखंडात व पेशवे काळात 1818 पर्यंत गायकवाड, होळकर, पवार, कदमबांडे, शिंदे या मराठी शासनकत्यार्र्ंनी आपली सत्ता येथे प्रस्थापित केली.
1818 मध्ये महाराष्ट्र इंग"जांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती होती. सातपुड्याच्या भागात आदिवसी भिल्लांची छोटी, छोटी 8-10 संस्थाने होती.
आदिवासींचा अस्तित्वासाठी संघर्ष 
इंग्रजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर येथे आर्थिक पाळेमुळे भक्कम करण्यासाठी जंगल व नैसर्गिक संपत्तीवरील हक्क आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आर्थिक वर्चस्व निर्माण केले. आदिवासींचे वनावरील व जमिनीवरील परंपरागत हक्क नष्ट करून त्याच्या स्वतंत्र जीवन जगण्याच्या अधिकारावरच इंग"जांनी गदा आणली. निसर्गदत्त स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्वातंत्र्यप्रिय आदिवासी बांधवांनी इंग"जी सत्ता झुगारून देण्यासाठी संघटित विरोध करण्याचा प्रयत्न सातपुड्याच्या कुशीत, रानावनात राहणाऱ्या सर्व भिल्ल बांधवांनी एकी करून जवळजवळ बत्तीस भिल्ल नेत्यांनी 1818 ते 1870 पर्यंत इंग"ज सरकारला हादरे दिलेत. इंग्रजांविरुद्ध उठावाची पहिली ठिणगी आदिवसी बांधवांनी पेटवली. सुमारे 50/60 वर्षांपर्यंत त्यांनी जोमाने, गनिमीकाव्याने इंग्रज सत्तेला हादरे दिलेत. दुर्दैवाने त्यांच्या या स्वातंत्र्याची, पराक"माची नोंद इतिहासानेही फारशी घेतली नाही. शासन व जनसामान्यांनीही या लढ्याकडे दुर्लक्ष केले याची खंत वाटते.
खान्देशचा पहिला जिल्हाधिकारी जॉन ब्रिग्ज याने मेजर इव्हान्स, लेफ्टनंट केनडी, कॅप्टन बर्च, कर्नल औट्रम या कार्यक्षम लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने उठाव दडपण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. इंग्रजांच्या क्रूर व अमानुष कृत्याविरुद्ध चिल्या भिल्ल, जीवा, कन्हैया, रामसिंग वसावा, उमेडसिंग, कुवरसिंग वसावा, हिऱ्या रामजी, देवचंद, संभाजी, दशरथ यासारख्या शूरवीरांनी भिमा नाईक, खाजा नाईक, भागोजी नाईक या आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला.
सात लाख खजिन्यांची लुट - 1857
1857 च्या उठावाचे पडसाद खानदेशात उमटले. विविध भिल नायक एकत्र येऊन त्यांनी इंग"जी सत्ता उलथून टाकण्यासाठी दीड हजारांवर आपली सेना उभारली. यासाठी पैसा व लष्करी साहित्याची निकड भासली. भीमा व काजी नाईकाने इंदूरकडून शिरपूर-धुळे मार्गे मुंबईस जाणारा 7 लाखांचा खजिना 17 नोव्हें. 1857 ला सेंधवा घाटात लुटला. 200 सैनिक (इंग्रज) व 300 भिल्लवीरांनी हल्ला करून खजिना लुटून इंग्रज सत्तेला हादरा दिला. याच वेळी 60 अफूने भरलेल्या गाड्याही लुटल्या.
अंबापाणीची लढाई - 11 एप्रिल 1858
सेंधवा घाटातून मुंबईस जाणारा व्यापारी व लष्करी मार्ग आदिवासी क्रांतिकारकांच्या ताब्यात राहणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. डोंगरमाथ्यावर त्यांच्याशी लढणे शक्य नव्हते. भिल्ल सेना खाज्या नाईकच्या साथीदारांसह सातपुडा डोंगररांगांत अंबापाणी येथे आहे, असे इंग्रजांना कळल्यावर त्यांनी मोर्चा तिकडे वळवला. भिल्लवीरांनी दगड-गोट्यांनी डोंगरावरून मारा केला. इंग्रजांचे जबर नुकसान झाले. 2 अधिकारी, 16 इंग्रज सैनिक मारले गेले. 65 भिल्लवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. 170 जखमी झाले. खाजा नाईकाचा एकुलता एक मुलगा पौलद सिंग मारला गेला. आदिवासींना माघार घ्यावी लागली. या लढाईत 400 आदिवासी भिल्ल वीरांगणांनी भाग घेतला. 400 वीरांगणांना कैद केले. त्याच्यावर अमानुष अत्याचार केलेत. दौलत सिंगच्या सुनेला (ड्रम ट्रायल) लष्करी ढोल वाजवून ठार केले. खाजा नाईकला बिनशर्त माफी जाहीर केली, पण तो शरण आला नाही. पुढे त्याच्या अंगरक्षकाने फितुरी करून ठार मारले. 1867 मध्ये भीमा नाईकाने उठाव केला. तो पराभूत झाला. त्यास पकडून देशाबाहेर जन्मठेपेवर पाठवले.
आदिवासींचा या संघर्षात कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता. निस्वार्थी, अडाणी, असंघटित आदिवासींनी स्वराज्याकरिता लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात खान्देशातील (धुळे, नंदुरबार) आदिवासी वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्याच्या पराक्रमांची फारशी नोंद इतिहासाने घेतली नाही. याचे दुखि वाटते.
धुळे-नंदुरबार जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढा अतिशय रोमहर्षक आहे. स्वातंत्र्याच्या विविध आंदोलन पर्वात येथील जनतेने सक्रिय तन-मन-धनाने सहभाग घेतला. येथील जनतेस प्रोत्साहित करण्यासाठी व त्याच्या कार्याची दखल राष्ट्रीय नेत्यांनी घेतली. या भागातील लोकांना राष्ट्रीय आंदोलनात अधिक सकि"य करण्यासाठी त्यांनी भेटी दिल्यात. 1905 ला टिळक, 1921 महात्मा गांधी-नंदुरबार, 1926 महात्मा गांधी- धुळे-शिरपुरा-दोंडाईचा, 1927 सरदार पटेल, नेहरू 1940 क्रांतिवीर विनायक सावरकर, विनोबा भावे, राजेंद्रप्रसाद इत्यादी. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या विविध आंदोलनात येथील जनतेचा सकि"य सहभाग होता. 1936 ला राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे भरले त्यात येथील जनतेने सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय आंदोलनात येथील जनतेबरोबर लहान मुलांनीही सकि"य सहभाग घेतला. 9 सप्टेंबर 1942 शहीद शिरीषकुमार, नंदुरबार 1942 च्या लढ्याचे प्रतिसाद सर्वत्र उमटलेत. पण नंदुरबारच्या शिरीषकुमार व त्याच्या 5 बालवीरांचे हौतात्म्य महत्त्वाचे ठरले. 9 सप्टें. 1942 हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा व प्रत्येक भारतीयाची मान ताठ होऊन त्यास स्फूर्ती मिळावी असा ठरला. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात शिरीषकुमार व त्याच्या बालसाथीदारांनी समीधा अर्पण केल्यात. हा इंग्रज सरकारला जबरदस्त हादरा होता. या बालवीरांनी जाज्वल्य देश प्रेमाचा संदेश दिला.
या जिल्ह्यातील संस्थात्मक इतिहासही महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासातील या संस्थांचे कार्य राष्ट्रीयदृष्ट्या मोलाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1894 ला लो. टिळकांचे अनुयायी श्री. शंकर, श्रीकृष्ण देवांनी संपूर्ण भारतात विखुरलेले रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित साहित्य (पोथ्या, हस्तलिखिते) गोळा केले. संत साहित्याची व इतर अस्सल संदर्भ साधनांची जपणूक करण्यासाठी समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली. येथे शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, रामदास व त्यांचे शिष्य यांनी लिहिलेल्या हस्तलिखित पोथ्या व काही शिवकालीन घराण्याची अस्सल संदर्भ दुर्मिळ साधने, चित्रे, पुस्तके याचा मोठा अमूल्य संग्रह येथे आहे.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे प्राचीन ऐतिहासिक वास्तू, वस्तू, कागदपत्रे, दप्तरखाने, स्मारके, गडकोट किल्ले हे देशाचे महान प्रतीके असून तो देशाचा महान राष्ट्रीय वारसा आहे. त्याची जपणूक व संवर्धन करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. असा महान अनमोल राष्ट्रीय वारसा जपण्याचे व संवर्धन करण्याचे राष्ट्रीय काम धुळ्याचे राजवाडे संशोधन मंडळ करीत आहे.
भारतात इतिहास संशोधनासाठी स्थापन झालेल्या ज्या मोजक्या संस्था आहेत. त्यात राजवाडे संशोधन मंडळ हे महत्त्वपूर्ण आहे. मराठ्यांनी आपल्या पराक"माने, कर्तृत्वाने परकीय सत्तेशी जो लढा दिला. त्या मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी, तसेच त्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक प्रपंचावर सत्य प्रकाश टाकणारी हजारो अस्सल कागदपत्रे हस्तलिखित वतननामे महजर, नाणी, मुद्रा यासारखी महत्त्वाची ऐतिहासिक संदर्भ साधने इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पायपीट करून अहोरात्र परिश्रम घेऊन ती गोळा केली. ती मंडळात जमा आहेत. त्याशिवाय काही वर्षांत दहा हजार मोडी, मराठी, इंग्रजी, फारशी कागदपत्रे, नऊ हजार हस्तलिखिते तसेच नंदुरबार येथील इतिहास प्रसिद्ध कानुगो देसाई घराण्याची कागदपत्रे यांची भर पडली आहे. असं"य कागदपत्रे, हस्तलिखिते अप्रकाशित असून ती प्रकाशित करण्याचे काम संस्थेचे पदाधिकारी करीत आहेत. ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या साधनांच्या दृष्टिकोनातून ही संस्था महाराष्ट्राची नव्हे, तर भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक केंद्र मानली पाहिजे.
या संस्थेतील कागदपत्रे, हस्तलिखिते, पोथ्या याचा अभ्यास करण्यासाठी एम. फिल., पीएच. डी., डी. लीट करण्यासाठी भारतातून व परदेशातून अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्ती अभ्यासासाठी, संशोधनासाठी येथे येतात.
संस्थेतर्फे 80 वर्षांपासून "संशोधक' त्रैमासिक प्रकाशित होते. यात देश-विदेशातील संशोधकाने अभ्यासकांचे शोधनिबंध प्रकाशित होतात. संदर्भ ग्रंथालयात हजारो ग्रंथ संशोधनासाठी उपलब्ध आहेत. संस्थेचे भव्य वस्तुसंग"हालय आहे. त्यात 4/5 शतकापासूनच्या मूर्त्या, नाणी मुद्रा, ताम"पट, शिलालेख, शस्त्रे, चित्रे, पोथ्या अशी अनेक ऐतिहासिक अस्सल संदर्भ साधने आहेत. जागतिक वस्तुसंग"हालयाच्या यादीत याची गणना होते.
संस्थेने अनेक दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. मागच्या वर्षी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पटील यांच्या शुभहस्ते 15 दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन संस्थेने केले. ही ग्रंथसंपदा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू म्हटली पाहिजे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात धुळे व नंदुरबार जिल्ह्याने प्राचीन काळापासून एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे हे येथे नमूद करावे लागेल. 

मंगळवार, ४ मार्च, २०१४

सातुपाड्यातील भिल्ल वीरांचा स्वातंत्र्यलढा

भिल्लांच्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे वैशिष्ट्ये असे की त्यात संपूर्ण भिल्ल जमातीने सामूहिक भाग घेतला. त्यांच्या नेत्यांची कुटुंबेही संघर्षात सहभागी झाली. त्यांचे आईबाप, बायका, मुले एकत्रितपणे इंग्रजांशी लढत होते. संपूर्ण सातपुडा परिसर स्वातंत्र्याकांक्षेने इंग"जांविरुद्ध पेटून उठला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक समाजगटांचा सकि"यसहभाग होता. त्याला भारतीय जनजाती अपवाद कशा असतील? जनजाती समूहातून राष्ट्रीय पातळीवर अनेक उठाव झाले. त्यामध्ये बस्तरचा उठाव, संथाळाचा उठाव, उरॉवांचे आंदोलन, तंट्या भिल्लाचा उठाव, कोकणी जमातीचा उठाव असे प्रमुख उठाव आहेत. बिरसा मुंडा, वीर बुधू भगत, तंट्या भिल्ल, शंकर शहा, उमाजी नाईक, समशेर सिंग भोसले, छोटुसिंग लमाण, धर्मप्रताप वंजारी, हनत बाबा अशा नररत्नांनी इंग"जांशी संघर्ष केला. या संघर्षाची कारणं काय होती? कशासाठी त्यांनी हा संघर्ष केला?
भारतातील जनजाती अगदी प्राचीन काळापासून स्वतंत्र वृत्तीने मुक्तपणे रानावनात निसर्गाशी एकरूप अवस्थेत जीवन जगत आले आहेत. त्यांनी कधीही दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारले नाही. स्वकियांच्या आणि परकियांच्या राजवटीतही जनजातीच्या मुक्ततेवर कोणतीही बंधने नव्हती. जनजातीची छोटी छोटी संस्थाने अबाधित ठेऊन त्यांच्यावर अंमल बसवला होता. इंग"जांनी मात्र जनजातीची संस्थाने खालसा केली. जंगले अधिग"हीत केली. तेथे वृक्षतोड केली. जंगलातील वृक्षतोड व गवत कापण्यासाठी शहरातील शेठ-सावकारांना कंत्राटे दिली. जंगल खाते निर्माण करून तेथे स्वत:ची सार्वभौम सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच जनजातीचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. वने सरकारच्या ताब्यात गेली. आणि वनउत्पादनेही त्यांचीच झाली. विविध करांचा बोजा मात्र जनजातीच्या डोक्यावर आला.
सुप्त निखारा
इंग्रजांच्या या दमननीतीमुळे समाजात खदखद निर्माण झाली आणि ती उमाजी नाईकांच्या रूपाने प्रकट झाली. 1826-28 मध्ये उमाजी नाईकांनी इंग"जांविरुद्ध संघर्ष सुरू केला. उमाजी नाईकांच्या उठावाची कारणे वेगळी होती. उमाजी नाईकांकडे पुरंदर किल्ल्याचे गडकरीपणाचे हक्क होते ते इंग"जांनी नाकारले. यातूनच उमाजी नाईकांनी उठाव केला. 1827 साली त्यांनी जाहिरनामा काढला, ""या पुढे शेतसारा बि"टिशांना बिलकूल न देता तो उमाजी नाईकाला द्यावा. उमाजी नाईक त्यांचा उपयोग गोरगरिबांसाठी करतील.'' जनताही उमाजी नाईकांना मानत होती. 1831 पर्यंत उमाजी नाईकांनी ब्रिटीशफौजांशी लढा दिला. सातारा, ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यावर उमाजी नाईकांचे अधिराज्य होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी उमाजींचा उठाव मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. शेवटी मॉकिन्टॉश या स्वतंत्र सेनाधिकाऱ्यांची नेमणूक कंपनीला करावी लागली. मॉकिन्टॉशच्या प्रबळ सेनेपुढे उमाजी नाईकांचा टिकाव लागला नाही. उमाजी नाईकांना चारी बाजूंनी घेरले आणि उमाजी नाईक व त्यांच्या साथीदारांना पकडले. पुण्याच्या सत्र न्यायालयात खटला चालला आणि 13 फेबु"वारी 1832 रोजी उमाजी नाईकांना फाशी दिली गेली.
उमाजींनी रामोशी समाजातील वीरांची सेना उभी केली होती. बेरड रामोशाच्या शौर्याचा सामना करताना बि"टिशांना नाकी नऊ आले. त्याचप्रमाणे सातपुडा, सातमाळा या भागातही बि"टिशांना जेरीस आणण्याचे काम भिल्ल वीरांनी केले. हिंदुस्थानात बि"टिशांचे राज्य प्रस्थापित होत असताना ते खान्देश आणि तापीच्या खोऱ्यातील आपली वसतिस्थाने सोडून सातपुडा, सातमाळ्याच्या डोंगररांगांत जाऊन राहिले. सातपुड्यात त्यांची विविध संस्थाने होती. 1819 पासून इंग्रजांनी आपल्या दमननीतीनुसार अनेक भिल्ल नाईक व सरदारांना ठार करायला सुरुवात केली. चोहोबाजूंनी नाकेबंदी केलेली असतानाही खंडू आणि रूपसिंग नाईक, चिला नाईक यांनी आपले शौर्य प्रकट केले. चिला नाईकाने खान्देशच्या पश्चिमेकडील ठाणे उद्‌ध्वस्त केले. तर तडवी भिल्लांनी तापी आणि सातपुड्याच्या मधील भूप्रदेशावर आपला अंमल प्रस्थापित केला. ब्रिटिशांनी या वेळी वेगळ्या नीतीचा वापर केला. या संघर्षात शरण येणाऱ्यांना नोकरीत ठेवण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे तापी खोऱ्यात पूर्वीप्रमाणे गाव वसवून राहण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. एका बाजूला हा उठाव आपण मोडून काढला असे ब्रिटिशांना वाटू लागले. तर दुसऱ्या बाजूला भिल्लांचे नवनवे नाईक उभे राहून हा लढा पुढे चालवू लागले.
1822 साली सातपुड्यातील जहाल पेंढारी व सातमाळ्यातील भिल्ल यांनी एकत्रित येऊन उठाव केला. त्याचे नेतृत्व हिऱ्या नाईकाकडे होते. त्याने आपली मोठी सेना तीन तुकड्यात विभागली व भडगाव, एरंडोल या भागात दोन तुकड्यांची रवानगी केली. कॅप्टन बि"ग्ज याने 1823 साली या उठावाविरुद्ध मोहीम उघडली. हिऱ्या नाईक पकडला गेला. त्या नंतर पुढे दोन वर्षे हा संघर्ष चालू राहिला.
ब्रिटिशांची कूटनीती
भिल्लांचा उठाव शांत होत नाही हे पाहताच इंग्रजांनी नवे धोरण अवलंबिले. एलफिन्स्टन हा त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर होता. 1825 साली त्यांनी भिल्लांविषयीचे धोरण जाहीर केले. त्यानुसार त्याने भिल्लांचं पारिपत्य करण्यासाठी पाठविलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांना भिल्लांच्या संदर्भात सौम्य धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला. पूर्वी ज्याप्रमाणे भिल्लाला निर्दयपणे ठार मारले जाई, पकडून त्यावर खटले भरले जात व फाशी दिली जाई, त्याप्रमाणे धोरण ठेवू नये असे आदेश दिले. भिल्लांच्या नाईकांशी सौजन्याने वागणे, त्यांना अनेकविध सवलती देऊन शेती करण्यास प्रोत्साहित करावे. भिल्लांना इंग"जी सेवेत घेण्यासाठी नोकरभरती करावी. त्याचप्रमाणे भिल्ल सैनिकांची स्वतंत्र तुकडी तयार करावी, असे मवाळ धोरण घेताना एलफिन्स्टनने हे ही बजावले की ""भिल्लांच्या टोळ्या अजूनही उठाव करीत आहेत. त्यांना अत्यंत कडक शासन करावे. जे लोक शरण येतील आणि समझोते करतील किंवा शस्त्रे खाली ठेवतील त्यांना पेंशनी द्याव्यात, नियमित वेतनाची तरतूद करावी. रस्त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांना देऊन आकर्षक मोबदला देण्यात यावा.
एका बाजूला हा उठाव शांत करायचा आणि दुसऱ्या बाजूला भिल्लांवर आपला अंमल प्रस्थापित करायचा, असा हा दुहेरी डाव होता. या धोरणानुसार नऊ भिल्ल माणसे लेफ्टनंट ऑऊट्रॉम यांच्या गळाला लागली. या नऊ जणांच्या मदतीने ब्रिटीशभिल्ल समाजात आपले बस्तान बसवू लागले. 1827 पर्यंत ब्रिटिशांना भिल्लांची एक रेजिमेंट तयार करण्यात यश आले. भिल्लांना उच्चपदावरच्या जागा दिल्या गेल्या. कारण इंग"जांच्या दृष्टीने बंडखोर असणाऱ्या भिल्लांच्या बंदोबस्तासाठी भिल्ल सैनिकांचाच वापर करण्याचा डाव योजनापूर्वक आखण्यात आला.
धग कायम राहिली
भिल्लांसाठी ब्रिटीशअसे धोरण राबवत असले तरी भिल्ल वीरांनी शौर्याची धग कायम चेतवत ठेवली. सातपुडा आणि सातमाळा डोंगररांगांच्या आधाराने राहणाऱ्या भिल्ल वीरांनी आपला लढा चालू ठेवला. 1826 मध्ये भडगाव आणि सुल्तानपूर या मोठ्या गावांवर हल्ले करण्यात आले. धावसिंग आणि सुभाण्या यांनी सिंदवा खिंड पूर्णपणे बंद करून टाकली. तेथून कोणतीही वाहतूक होत नव्हती. या दोघांना पकडण्यात बि"टिशांना यश आले. पण काही काळात त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली आणि पुन्हा उठाव केला. देवचंद नाईक या उठावात हुतात्मा झाला. अखेर सुभाण्या नाईकला पकडण्यात आले आणि धुळे कारागृहात ठेवले गेले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. 1811 मध्ये तडवी भिल्लांनी उत्तर-पूर्व खान्देशात हल्ले केले. ब्रिटिशांबरोबर चकमक झाली. त्यात 469 तडवी सैनिकांना कैद करण्यात आले. 1841 मध्ये अहमदनगर येथील भिल्ल वीरांनी पिंपळनेर येथील इंग"जांचा खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. मोठी चकमक झाली. भिल्लांचा पराभव झाला. त्याचवर्षी ब्रिटिशांच्या सेनेतून फुटून भागण्या नाईक याने उठाव केला. नर्मदाकाठी भागण्या नाईकची सेना आणि ब्रिटीशयांची गाठ पडली. या चकमकीत भागण्या नाईकला गोळी लागली. काही भिल्ल मारले गेले. 1842 साली तडवी भिल्लांनी बेकाऱ्या व भागचंद यांच्या नेतृत्वाखाली सावदा व यावल या मोठ्या गावावर हल्ले केले. परंतु त्यांचा पराभव झाला. भागचंद मारला गेला तर बेकाऱ्याला ब्रिटिशांनी कैद केले.
बि"टिशांनी आपल्या सैन्यात भिल्ल्लांना जाणीवपूर्वक प्रवेश दिल्याने इंग्रज सेनेचे बळ वाढले होते. "कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काल' या म्हणीप्रमाणे इंग"जी सेनेतील भिल्लांच्या मदतीने स्वातंत्र्यप्रेमी भिल्लाचा पाडाव करण्यात यश मिळू लागले. 1846 ते 1852 या काळात कोणताही मोठा उठाव झाला नाही. सगळे आलबेल आहे, असे वाटत होते. पण स्वातंत्र्यप्रेमी भिल्ल अस्वस्थ होते. त्यांच्या मनात खदखद होती. मनातील या उद्रेकांना वाट करून देण्यासाठी योग्य त्या अनुकूल काळाची वाटत पाहावी लागणार होती. या संधीची वाट पाहत सातपुड्यातील भिल्ल समाज हळूहळू पुन्हा संघटित होत होता.
स्वातंत्र्याची फुंकर - निखारा फुलला
1857 मध्ये संपूर्ण हिंदुस्थान पेटला. ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यसमर छेडले गेले. तेव्हा सातपुडा-सातमाळ्यातील भिल्ल शांत राहणे शक्यच नव्हते. अनेक वर्षे मनात दाबून ठेवलेला असंतोष उफाळून आला. या उद्रेकांचा वणवा पेटला. त्याला नेतृत्व लाभले भागोजी नाईक व कजरसिंग नाईक यांचे. इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भिल्लांनी आपले सेना उभी केली. तिची अंदाजे संख्या दीड हजाराएवढी होती. यासाठी लागणारी कुमक उभी करावी लागणार होती. भिमा नाईक व काजी नाईक यांनी इंदूरहून शिरपूरमार्गे मुंबईकडे जाणारा 7 लाखांचा खजिना 17 नोव्हेंबर 1857 रोजी सेंदवा घाटात लुटला. 200 इंग्रज सैनिकांवर 300 भिल्ल वीरांनी हल्ला करून इंग्रजांना हादरा दिला. याच वेळी अफूने भरलेल्या 60 गाड्याही लुटण्यात आल्या.
सेंदवा घाट भिल्लांच्या ताब्यात राहणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. पण डोंगर माथ्यावर भिल्लांशी लढणे शक्यही नव्हते. भिल्लसेना खाज्या नाईकांसोबत अंबापाणी येथे आहे हे कळताच इंग"जांनी तिकडे मोर्चा वळवला. भिल्ल वीरांनी दगड-गोट्यांचा मारा केला. यात 2 अधिकारी व 16 सैनिक मारले गेले. 65 भिल्लांना हौतात्म्य आले. खाजा नाईकचा मुलगा फौलाद सिंग मारला गेला. या लढाईत केवळ भिल्ल वीरांनीच भाग घेतला असे नाही तर 400 भिल्ल विरांगनाही सहभागी झाल्या. त्यांना कैद केले गेले. दौलत सिंगाच्या सुनेला लष्करी ढोल वाजवून ठार करण्यात आले. खाजा नाईकला बिनशर्त माफी जाहीर करण्यात आली. पण तो शरण आला नाही.
काजीसिंग यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला हा उठाव स्वातंत्र्य समराचा एक भाग होता. 1857-58 मध्ये उत्तर हिंदुस्थानात तात्या टोपेंनी केलेल्या सशस्त्र उठावाशी या उठावाचा संबंध होता. काजीसिंग व भागोशी नाईक यांचे तात्या टोपेंशी संबंध होते असे संकेत ब्रिटिशांच्या कागदपत्रावरून मिळतात. 3 नोव्हेंबर 1858 मध्ये तात्या टोपे खान्देशावर चालून येत आहेत अशी बातमी आली. खान्देशात काजीसिंग, भागोजी यांनी उठाव करावा, ब्रिटीशसेनेला जेर करावे आणि उत्तरेकडून तात्या टोपे यांनी खान्देशात प्रवेश करावा अशी योजना होती. सर ह्यू रोज याने अक"ाणी मार्गे खान्देशात येणाऱ्या तात्या टोपेंना अडवले. त्यामुळे तात्या टोपे आपल्या सैन्यासह खांडव्यात परतले. काजीसिंग आणि भागोजी नाईक हे एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे सगळाच बेत फसला. भागोजी नाईकाप्रमाणे भीमा नाईक हा देखील 1857 च्या स्वातंत्र्य समरातील प्रमुख भिल्ल सरदार होता. भीमा नाईकाला पकडण्यासाठी 1000 रुपयाचे इनाम बि"टिशांनी जाहीर केले होते. 28 सप्टेंबर 1857 मध्ये ईस्ट इंडिया सचिवांना पाठवविलेल्या गोपनीय अहवालात म्हटले आहे की, ""भीमा नाईक हा दिल्लीच्या बादशहाच्या आदेशाने इंग"जांशी लढत आहे. त्यानेच लेफ्टनंट केनडीच्या सैनिकी तुकडीवर हल्ला केला आहे.'' 30 ऑक्टोबर 1857 एस. मॅन्सफिल्ड या खान्देशातील न्यायाधीशाने आपल्या पत्रात लिहिले आहे,"" भीमा नाईक कजरसिंग त्याचप्रमाणे भिल्ल जमातीच्या इतर नाईकांनी त्यांच्या दीड हजार अनुयांसह शिरपूरवर हल्ला केला. भिल्लांचा पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे तेथील कॅप्टन बर्च सुलतानपूर जिल्ह्याकडून सैनिकांकडून मदत मिळवली.'' या ब्रिटिशांच्या पत्रावरून सातपुड्यातील वीर भिल्लांनी आपला वचक कसा निर्माण केला होता हे लक्षात येते. 
भिल्लांचा उठाव काबूत येत नाही म्हटल्यावर ब्रिटिशांनी कूटनीती मार्ग स्वीकारला. भागोजी नाईकांच्या आईला कैद केले. या मागची भूमिका ब्रिटिशांच्या एका पत्रातून स्पष्ट होते. भिल्ल महिलांविषयी त्यात लिहिले आहे, ""त्या भिल्ल जमातीच्या पुरुषांसार"याच उपद्रवकारक आहेत. त्या माहिती मिळवतात. पुरुषांपर्यंत पोहोचवतात. स्वयंपाक करतात आणि प्रसंग पडल्यास हातात शस्त्रे घेऊन युद्धही करतात. त्यामुळे भागोजी आणि इतर नाईक हाती लागेपर्यंत त्यांना बंदिस्त ठेऊन ओलीस ठेवावे म्हणजे भिल्ल नाईक लवकर शरण येऊ शकतील.''
भिल्लांच्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे वैशिष्ट्ये असे की त्यात संपूर्ण भिल्ल जमातीने सामूहिक भाग घेतला. त्यांच्या नेत्यांची कुटुंबेही संघर्षात सहभागी झाली. त्यांचे आईबाप, बायका, मुले एकत्रितपणे इंग"जांशी लढत होते. संपूर्ण सातपुडा परिसर स्वातंत्र्याकांक्षेने इंग"जांविरुद्ध पेटून उठला होता.
लोण पसरले
सातपुड्याप्रमाणेच 1858 मधे पाचोड, यावल परिसरात भिल्लांनी इंग"ज शासनास आव्हान दिले. इंग"जांनी सैन्याच्या तुकड्या वाढवून भिल्लांना घेरले. तेरा भिल्ल पकडले गेले. यावल प्रमाणे नगर जिल्ह्यातही उठाव झाला. नांदगाव येथे इंग्रजांना भिल्लांशी लढावे लागले. नगर जिल्ह्यात इंग"जांनी भिल्लांची धरपकड केली. काहींवर राजद्रोहाचा खटला चालवून देहांताची शिक्षा सुनावली. महादेवाच्या डोंगरावरील भिल्लही संघटित झाले. हरजी नाईक व पुतोजी नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा दिला गेला.
योद्धे गुन्हेगार झाले
1857 च्या स्वातंत्र्य समरात इंग्रजांना जय मिळाला. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या जनजातीचे उठाव मोडून काढले गेले. खान्देशातील सातपुडा, सातमाळा परिसरातील हजारो स्वातंत्र्यवीरांना फाशी दिली गेली, तोफेच्या तोंडी दिले, क्रूरपणे गोळ्या घातल्या. हा सगळा इतिहास रोमहर्षक आहे. पुन्हा अशा प्रकारचा उठाव होऊ नये याची काळजी इंग"जांना होती. त्यातूनच गुन्हेगारी जमातीचा कायदा जन्माला आला. हा कायदा जरी 1871 साली अस्तित्वात आला असला तरी त्याच्या प्रसव वेदना 1857 च्या स्वातंत्र्य समरापासून सुरू झाल्या होत्या. 1871 चा जन्मजात गुन्हेगार जमातीचा कायदा पुढे 1950 पर्यंत चालू राहिला. आणि शौर्याच्या राष्ट्राभिमानाचा वारसा जपणारे योद्धे गुन्हेगार झाले.
स्वातंत्र्यानंतर हा कायदा बदलला गेला तरी समाजमनावर इंग"जांनी लादलेली गुन्हेगारी जमातीची छाप आजही कायम आहे. ज्या भूभागातून हा स्वातंत्र्यलढा या भिल्लवीरांनी लढवला तो भूभाग आजही उपेक्षित आहे. विकासाची गंगा अजूनही तेथपर्यंत पोहोचली नाही. या स्वातंत्र्ययोद्ध्यांप्रमाणे सातपुडाही उपेक्षित राहिला आहे. नाही चिरा, नाही पणती... याच शब्दात त्यांचे वर्णन करावे लागेल.
संदर्भ :रवींद्र गोळे, " उपेक्षित पर्व - प्रभाकर मांडे * लोक आणि संस्कृती - गिरीश प्रभुणे * 1957 चे स्वातंत्र्य समर, दक्षिण भारताचे योगदान - इतिहास संकलन समिती * भटके-विमुक्त एक चिंतन -
दादा इदाते

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

आदिवासी भिल समाज महाराष्ट्र राज्य

भिल्ल-आदिवासी समाज

'सातपुडा प्रदेश' हा प्रामुख्याने भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये हा प्रदेश विखुरलेला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातील पर्वतरांगांचा भाग सोडला तर सातपुडा पर्वतांच्या रांगा महाराष्ट्रात अमरावती, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत पसरलेल्या आहेत.

सातपुडा पर्वत रांगांमधील तापी व नर्मदा नद्यांच्या मधील पहाडी प्रदेश व आजूबाजूचा सखल व पर्वतमय प्रदेश 'भिलवाड' या नावाने ओळखला जात होता. सातापुड्यापासून विंध्य, अरवली पर्वतांच्या रांगांपर्यंत भिलवाड पसरलेला होता.

प्रभू रामचंद्र जेव्हा दंडकारण्यात आले तेव्हा त्यांना शबरी नावाची भिल्ल महिला भेटली होती हे आपणास रामायणात ज्ञात आहे. त्याकाळी या प्रदेशात राहणा-या लोकांना 'शबर', 'किरात', निषाद' या नावाने ओळखले जात असे. हे लोक दुसर-तिसरे कोणी नसून सातपुड्यातील भिल्लच होते. महादेवाने जिचे प्रियाराधन केले अशा एका विलक्षण स्त्री पासून यांची वंशावळ सुरु झाली अशी एक पारंपरिक श्रद्धा आहे.

भिल्ल हि महाराष्ट्रातील ऐतिहासिकमहत्त्वाची व संख्येने एक प्रमुख आदिवासी जमात आहे. भारतातील प्राचीन शिलालेखांत आणि प्राचीन साहित्यात भिल्लांचे उल्लेख सापडतात. इतकी हि पुरातन जमात आहे.

गडद तपकिरी वर्ण, गोलगरगरीत चेहरा, रुंद व भलामोठा जबडा आणि सुदृढ कमावलेले शरीर हि त्यांची वैशिष्ट्ये होत.

भिल्ल जमातीत काही पोटवर्ग आढळतात. त्यात भिल्ल गरासिया, ढोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, बरडा भिल्ल, डुंगरी=गरासिया, मेवासी भिल्ल, रावळ भिल्ल, तडवी भिल्ल, धानका भिल्ल आदींचा यात समावेश होतो.

धुळे जिल्ह्यात भिल्ल जमातीच्या अनेक शाखा आहेत. त्यात बरडे भिल्ल, मावची, वळवी, वसावे, पाडवी, पावरा, तडवी, धानका, लाढ्या भिल्ल, मथवाडी भिल्ल, बोंडे-गवाल भिल्ल, कोटले भिल्ल, टेड(धेड) भिल्ल, नाईक भिल्ल, गामित, मेवाशी भिल्ल, आदींचा समावेश होतो.

आर्थिकदृष्ट्या भिल्ल हि स्थायिक शेतक-यांची जमात आहे. परंपरेने हि निष्णात तीरंदाजाची जमात आहे. बहुतांश भिल्ल हे कष्टकरी किंवा मजुरी करतात. काहीजण जंगली माळ गोळा करून त्याची विक्री करतात. ते चांगल्यापैकी शिकारी असून मासे पकडण्यात प्रविण आहेत. ते जाळ्यांचा तसेच सापळ्याचाही वापर करतात. शिकार करण्यासाठी तीर-कामठा व जाळी हि आयुधे ते वापरतात. खाण्यायोग्य कंदमुळे जमविण्याचे कामही केले जाते.

भिल्लांच्या जेवणात भात, ज्वारीची भाकरी, तुरीचे वरण प्रामुख्याने असते.

भिल्ल पुरुषांच्या कमरेला जेमतेम गुढघ्यापर्यंत पोहचेल एवढे आखूड नेसू गुंडाळलेले असते. अंगात कुडता व डोक्याला पागोटे असते. स्त्रिया कमरेभोवती जुनेर गुंडाळतात. अंगात चोळी घालतात व डोक्याला मुंडासे बांधतात. पुरुष व स्त्रिया दोघेही कानात चांदीच्या बाळ्या व बोटात चांदीची वेढणी घालतात. स्त्रिया दंडावर बुलीया, कंगना माला, नथनी आणि इतरप्रकारचे दागिने घालून नटतात.

आदिवासींच्या चालीरीतीनुसार त्यांच्यात बहुपत्नीत्व व प्रौढ विवाहाची पद्धती रूढ आहे. त्यांना विधवा विवाहही संमत आहे. विवाहाच्या वेळी नृत्यगायनाचा आनंदोत्सव साजरा होतो. यात मद्याची रेलचेल असते.

सातपुड्यातील भिल्लांची पारंपरिक लग्न पद्धती मनोरंजक आहे. नवरा मुलगा मुलीला यात्रेत किंवा बाजारात पाहतो व लग्नाची मागणी घालतो. मागणीप्रमाणे लग्न जमले नाही तर मुलगा मुलीला तिच्या संमतीने पळवून नेतो. मुलीकडून हुंडा घेतला जात नाही. याउलट मुलाकडून मुलीला दहेज दिले जाते. हि रक्कम पाचशेपासून दोन हजारापर्यंत असू शकते. लग्नासाठी मुहूर्त पाहिला जात नाही. फक्त शनिवार व अमावास्येच्या दिवशी लग्ने लावली जात नाहीत. लग्न गावातला भगत लावतो. लग्नानंतर वधू-वर मांडवात नऊ फेरे मारतात. लग्नात सर्वांना जेवण व दारू दिली जाते.

भिल्ल लोकांच्या रितीरिवाजाप्रमाणे पाच महिन्यानंतर गर्भपात केल्यास तो गुन्हा समजण्यात येतो.

वाघदेव, धानदेव, सर्पदेव, म्हसोबा, वेताळ, डोंगरदेव हे भिल्लांचे देव आहेत. त्यांची ते पूजा करतात. सातपुडातील भिल्लांच्या वाघदेव, रीमदेव, नंदुरा देव, पालुडा देव, बडादेव, याहामोगी इत्यादी देवदेवता आहेत. शिवाय प्रत्येक गावाच्या सीमेवर हिवारीया हा देव असतो. तर गावात 'बनीजाह' हे दैवत असते. पावसाळ्यात वाघ देवाचा सण साजरा केला जातो. या देवाला कोंबडी कापली जाते व पालेभाजीचा नैवद्यही दाखविला जातो. त्यानंतर भिल्ल रानातील पालेभाज्या खाण्याला सुरुवात करतात. रीम देवाचा सण शिवरात्रीला साजरा केला जातो.

माहिती सौजन्य- डॉ. गोविंद गारे साहेब

संकलन- राहुल सोनवणे