शुक्रवार, ७ मार्च, २०१४

गौरवशाली इतिहासाचा वारसा --धुळे-नंदुरबार

प्राचीन काळापासून हा प्रदेश शेती, विद्या, कला, उद्योगधंदे या दृष्टीने संप होता. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात. लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व 230 च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याच्याच काळात महाराष्ट्रात इतिहासाचा नवा अध्यास सुरू झाला. स्थापत्य कला, नृत्य, संगीत, विणकाम, चित्रकला या क्षेत्रांत प्रगती साधली गेली. व्यापार उद्योगास उत्तेजन मिळाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले.
महाराष्ट्रातील उत्तरेकडे असलेल्या अविकसित धुळे जिल्ह्यास पुरातन काळापासून फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथील संस्कृती भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, राजकीय परिस्थिती तसेच अतिप्राचीन वस्तिस्थळे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, गढ्या, पायविहिरी अभिनव जल व्यवस्थापन, प्रासादिक वास्तू, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक स्थळे, कोरीव लेण्या या सर्व गोष्टींचा भव्य ऐतिहासिक वारसा या जिल्ह्यास लाभला आहे. ही सर्व साधने पर्यटनाच्या, संशोधनाच्या व अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. येथील सर्व संसाधनांचा व पायाभूत सोयीसुविधांचा कालपद्धती व नियोजनपूर्वक विकास साधला, तर धुळे जिल्हा महाराष्ट्राचे नव्हे तर जगाच्या अभ्यासकांचे, पर्यटकांचे लक्ष वेधून घेईल, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
इंडियन अर्किऑलॉजी-ए-रिव्हियू 1953 ते 54 महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन या पुस्तकातील यादीच्या आधारे खानदेशात (धुळे, नंदुरबार) जिल्ह्यातील 30/40 हजार वर्षांपासून गावांनी अतिप्राचीन वैभवशाली इतिहास आपल्या उदरात साठवून ठेवला आहे.
तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा उत्खननीय पुराव्यावरून शोध लागला. खानदेशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सावळदा (शिरपुरा-धुळे मार्गावर) येथे उत्तर हरप्पन काळात संस्कृती विकसित झाली ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ. स. पूर्व 2200 ते 1800) उदयास आली. खानदेशात एका स्वतंत्र संस्कृतीचा त्याकाळात उदय झाला. असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबार भागास लाभला आहे.
उत्तर हरप्पन संस्कृती 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी येथेच विकसित झाली. त्या पुरातत्त्वीय संस्कृतीचे अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले. खानदेशात 200च्या वर प्राचीन संस्कृतीची स्थाने (साईट) पुरातत्त्वीय संशोधकांना मिळाल्यास 100च्या वर स्थाने (साईट) धुळे जिल्ह्यात मिळाल्या. प्राचीन काळापासूनची ऐतिहासिक वारशांची परंपरा आपणास लाभलेली आहे.
साक्री भाडणे येथील अश्मयुगीन हत्यार आजही मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात प्रथमदर्शनी भागात काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेले आहे. हा आपला अनमोल ऐतिहासिक वारसा जगापुढे दर्शनासाठी ठेवला आहे. हे धुळेवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
इ. स. पूर्व 1400 ते 1000 जार्वे संस्कृतीकालीन अवशेष (अक्कलपाडा) चिंचखेडा येथे मातीची भांडी, खापरे व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृद्ध संस्कृती नांदत होती.
धुळ्यापासून 50 कि.मी. अंतरावर असलेले अभीरकालीन किल्ला, भामेर (भंमगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारतकालीन राजा युवनाश्न हा पावसाळ्यात येथे वास्तव्य करून राहत होता. त्याची उपराजधानी भामेर येथे होती.
मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. भामेर किल्ल्यापासून एक मार्ग धुळ्यास पुढे नागपूर, आग"ा असा, एक मार्ग सुरत-भडोच, एक मार्ग नंदुरबार असा जातो. प्राचीन काळापासून या व्यापारी मार्गावरच (साईवाह पथ) लेण्या कोरल्या गेल्यात. येथे जैन लेण्या आजही प्राचीन ऐतिहासिक कलेचा वारसा टिकवून आहेत. यादवकालीन लक्ष्मीदेव या राज्याचे राज्य या भागावर होते. तसा शिलालेख आजही येथे गतस्मृतीचा उजाळा देत आहे. या किल्ल्यातील पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. आजही येथे 128 पाण्याच्या टाक्या डोंगराच्या कडेकपारीत कोरलेल्या आहेत. गत संस्कृतीच्या पाऊलखुणा, भग्न, भव्य दरवाजे, कोरीव खांब, उद्‌ध्वस्त वाडे वैभवशाली ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात.
धुळ्याच्या ईशान्येला 57 कि. मी. अंतरावर तापी नदीच्या उत्तर तिरावर मध्ययुगीन कालखंडातील खान्देशच्या राजधानीचे गाव म्हणजे थाळनेर, प्राचीन, मध्ययुगीन काळापासून समृद्ध असलेला हा निसर्गरम्य परिसर. 14 व्या शतकात फारुकींनी येथे राज्य स्थापून आपली प्रथम राजधानी येथेच निर्माण केली.
पुरातत्त्वीय उत्खननावरून प्राचीन काळापासून येथे वस्ती होती. थाळनेरला प्राचीन ऐतिहासिक वारशाचे अस्सल पुरावे मिळाले आहेत. कुंभकर्णीवंशीय भानुषेण राज्याच्या काळातील कार्तिक शुद्ध पंचमी इ. स. 330 मधील ताम्रपट येथे सापडला. संवत 447 वैशाख शुद्ध पौर्णिमा चालुक्यवंशीय राजाचा ताम"पट सापडला. थाळनेर परिसर समृद्ध व संप असल्याने विविध राजवटींनी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली.
थाळनेरचा किल्ला - तापीकाठी भक्कम व अभेद्य असा किल्ला 13व्या शतकात यादव राजांनी बांधला. किल्ल्यास 6 बुरूज व 7 दरवाजे होते. त्यापैकी दोन बुरूज व दोन पडके भव्य दरवाजे प्राचीन इतिहासाची साक्ष देत पडक्या अवस्थेत उभे आहेत.
मध्ययुगात थाळनेर हे मोठे व्यापारी केंद्र होते. 1660 मध्ये परदेशी प्रवासी टॅर्विनियर येथून गेला तो म्हणतो, सुरत-बऱ्हाणपूर मार्गावरील थाळनेर हे प्रमुख व्यापार केंद्र होते. मराठे काळात येथील व्यापारी पेढ्यांच्या हुंड्या पुणे-वाराणसी-बऱ्हाणपूर येथे जात. थाळनेरला आर्थिक व्यापारी संपतेचाही ऐतिहासिक वारसा लाभला होता.
थाळनेरचे हाजिरे (गोलघुमट) 
खान्देशच्या मध्ययुगीन वास्तुशास्त्राचे वैभव संपतेचे दर्शन घडविणारे हे हाजिरे मशिदीच्या आकाराचे, तर काही मंदिराच्या आकाराचे हिंदू-मोगल व फारुकी वास्तुशास्त्राचा संगम घडविणारे हे महाराष्ट्र नव्हे तर भारतातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक वारशेच म्हटले पाहिजे. येथील फारशी भाषेतील शिलालेख, स्थापत्य, शिल्पकाम व रंगकाम तत्कालीन खान्देशातील कलेची साक्ष देतात. आजही परदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक येथे येतात. धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशात सोनगीर, लळिंग, रायकोट या गिरीदुर्गाचे महत्त्वाचे स्थान आहे.
मध्ययुगीन स्थापत्य शैलीत हेमांडपंथी स्थापत्य शैली महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण आहे. धुळे जिल्ह्यातील त्या शैलीचे मंदिरे बळसाणे, मेथी, जोगशिलू, भोनगाव, दराणे, इंदवे या ठिकाणी आहेत. या मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून त्या भागाची आर्थिक व वास्तू समृद्धी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीची जाण आपणास होते. तेथील ऐतिहासिक वारसा हा जोपासण्यासारखा आहे.
धुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशात येथील धार्मिक सण, उत्सव, रथयात्रा, यात्रा, कुलदेवता पूजन हे महत्त्वपूर्ण आहे.
रथयात्रा- भारतात प्राचीन काळापासून रथयात्रा महत्त्वपूर्ण धार्मिक महत्त्व आहे. धुळे जिल्ह्यात रथयात्रांना 200/300 वर्षांचा इतिहास आहे. धुळे, सोनगीर, शिरपूर, सिंदखेडा, बेटावद, कासारे इत्यादी. यात बालाजीचा रथोत्सव 10 ते 15 दिवस चालतो. यातच धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक एकता साधण्याचा प्रयत्न होतो.
कुलदेवता- धुळे जिल्ह्यास प्राचीन वस्तिस्थाने असल्याने अनेक प्राचीन वस्तिस्थानाच्या ठिकाणी कुलदेवतांची स्थाने निर्माण झालीत. त्यांना हजारो वर्षांचा ऐतिहासिक धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. धुळे-एकवीरा देवी, कोकले-नागाई माता, चिंचखेडा-म्हाळसा माता, म्हसदी-धनदाई देवी, झिरणीपाडा-धनाई पुनाई माता, कासारे-कानबाई माता, निजामपूर-म्हसाई माता.
अभिनव जल व्यवस्थापन सिंचन पद्धत (फड पद्धत) 
धुळे जिल्ह्यात साक"ी तालुक्यात जी जलव्यवस्थापनाचे अभिनव सिंचन पद्धत आहे. ती जगातील ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. हे धुळे जिल्ह्याचे भाग्यच मानावे लागेल. आजमितीस नष्ट होण्याच्या अवस्थेत आली आहे.
रामायण, महाभारत काळापासून आजतागायत तो चालू आहे. नासा येथील अभ्यासक डॉ. पियानो यांच्या अभ्यासावरून खान्देशचा (धुळे जिल्ह्याचा) भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार 66 लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही 10 लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. धुळे जिल्ह्यास पांझरा, कान या नद्यांवर बंधारे बांधून त्या पाण्यावर अभिनव जलसिंचन व्यवस्था प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे.
प्राचीन काळापासून हा प्रदेश शेती, विद्या, कला, उद्योगधंदे या दृष्टीने संप होता. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात.
लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व 230 च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. त्याच्याच काळात महाराष्ट्रात इतिहासाचा नवा अध्यास सुरू झाला. स्थापत्य कला, नृत्य, संगीत, विणकाम, चित्रकला या क्षेत्रांत प्रगती साधली गेली. व्यापार उद्योगास उत्तेजन मिळाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले. सुरत-बऱ्हाणपूर सुरत-नागपूर, नागपूर-आगा इत्यादी मार्ग.
इ.स. 240 ते 419 पर्यंत अभिरांनी या प्रदेशावर राज्य केले. खान्देश प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. याबद्दल प्रो. गि"यर्सन, प्रो. के. एम. मुन्शी, टौलेमी, डॉ. बेवर, श्री. वैद्य यांनी विविध मते मांडली आहेत. मार्कें डेय पुराणात अभिरांची दक्षिण देशाचे रहिवाशी म्हटले आहे. नाशिकजवळील अंजनेरी अभिरांची राजधानी होय.
अहिरणी भाषाही महाराष्ट्र संस्कृतीला अहिरांनी दिलेली मोठी देणगी होय. अभिरांची किंवा अहिरांची बोली ती अहिराणी हा सिद्धांत सर्व संशोधक मान्य करतात. अहिराणी ही मौखिक बोली धुळे-नंदुरबार जिल्ह्यात 50/60 टक्के भागात आजही बोलली जाते. या अहिरांचा उल्लेख महाभारतातही आला आहे.
अभिरांनंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, यादव राजवटींनी येथे सत्ता प्रस्थापित केली. विविध कालखंडातील ताम"पट, शिलालेख सापडले आहेत. धुळे, तोरखेडा, तळोदे बेटावर पिंपळनेर, कासारे, थाळनेर इत्यादी ठिकाणी ताम"पट सापडले आहेत.
यादवांनी सुमारे 300 वर्षे खान्देशावर वर्चस्व निर्माण केले. या काळात आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन स्थापत्य, कला व उद्योगक्षेत्रात प्रगती झाली. या काळात जैन धर्मीयांचा प्रभाव वाढला. मांगी-तुंगी, भामेर येथे जैन लेण्या कोरल्या गेल्यात.
16/17 व्या शतकात मुस्लिम सत्ताधीशांनी या संप प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला व आपली सत्ता प्रस्थापित केली.
अनेक परकीय प्रवाशांना प्रवास वर्णनात येथील समृद्धीची व संपतेची माहिती मिळते. 14व्या शतकात आफ्रीकन प्रवासी इब्न बतुता प्रकाशा-नंदुरबार-सोनगीर या भागांतून औरंगाबादला गेला. त्याने या भागातील संपतेची माहिती आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. शिवकाळात न्यू बेरी 1585-1601 हा युरोपीयन प्रवासी येथून गेला. त्याने कापूस, धान्य विपुल होते. तसेच ऊस व गुळाचे उत्पादन भरपूर होते. 1601 मध्ये सलबॅक 1609 मध्ये हॉकिन्स हा धुळे जिल्ह्यातून गेला. त्यांनी आपल्या प्रवास वर्षातून आर्थिक संपतेची माहिती दिली आहे. टॅव्हेनियर, मार्टिन, मॉरीस यांनीही धुळे-नंदुरबारविषयी माहिती लिहिली आहे. फ्रेंच प्रवासी थॅवेनो हा शिवकाळत सुरत-औरंगाबाद मार्गे नवापूर, कोंडाईबारी-दहिवे-पिंपळनेर मार्गे गेला त्याने या भागाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची माहिती आपल्या प्रवास वर्णनात दिली आहे. या परदेशी प्रवाशांच्या प्रवास वृत्तांतावरून या जिल्ह्याची खरी अस्सल माहिती मिळते. पूर्व वैभवाची कल्पना येते. हा भाग सतत पुढे उपेक्षित राहिला. त्याची उपेक्षा राजकर्त्यांकडून तसेच विद्वानांकडूनही झाली.
मराठे कालखंडात व पेशवे काळात 1818 पर्यंत गायकवाड, होळकर, पवार, कदमबांडे, शिंदे या मराठी शासनकत्यार्र्ंनी आपली सत्ता येथे प्रस्थापित केली.
1818 मध्ये महाराष्ट्र इंग"जांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती होती. सातपुड्याच्या भागात आदिवसी भिल्लांची छोटी, छोटी 8-10 संस्थाने होती.
आदिवासींचा अस्तित्वासाठी संघर्ष 
इंग्रजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर येथे आर्थिक पाळेमुळे भक्कम करण्यासाठी जंगल व नैसर्गिक संपत्तीवरील हक्क आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आर्थिक वर्चस्व निर्माण केले. आदिवासींचे वनावरील व जमिनीवरील परंपरागत हक्क नष्ट करून त्याच्या स्वतंत्र जीवन जगण्याच्या अधिकारावरच इंग"जांनी गदा आणली. निसर्गदत्त स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्वातंत्र्यप्रिय आदिवासी बांधवांनी इंग"जी सत्ता झुगारून देण्यासाठी संघटित विरोध करण्याचा प्रयत्न सातपुड्याच्या कुशीत, रानावनात राहणाऱ्या सर्व भिल्ल बांधवांनी एकी करून जवळजवळ बत्तीस भिल्ल नेत्यांनी 1818 ते 1870 पर्यंत इंग"ज सरकारला हादरे दिलेत. इंग्रजांविरुद्ध उठावाची पहिली ठिणगी आदिवसी बांधवांनी पेटवली. सुमारे 50/60 वर्षांपर्यंत त्यांनी जोमाने, गनिमीकाव्याने इंग्रज सत्तेला हादरे दिलेत. दुर्दैवाने त्यांच्या या स्वातंत्र्याची, पराक"माची नोंद इतिहासानेही फारशी घेतली नाही. शासन व जनसामान्यांनीही या लढ्याकडे दुर्लक्ष केले याची खंत वाटते.
खान्देशचा पहिला जिल्हाधिकारी जॉन ब्रिग्ज याने मेजर इव्हान्स, लेफ्टनंट केनडी, कॅप्टन बर्च, कर्नल औट्रम या कार्यक्षम लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने उठाव दडपण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. इंग्रजांच्या क्रूर व अमानुष कृत्याविरुद्ध चिल्या भिल्ल, जीवा, कन्हैया, रामसिंग वसावा, उमेडसिंग, कुवरसिंग वसावा, हिऱ्या रामजी, देवचंद, संभाजी, दशरथ यासारख्या शूरवीरांनी भिमा नाईक, खाजा नाईक, भागोजी नाईक या आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला.
सात लाख खजिन्यांची लुट - 1857
1857 च्या उठावाचे पडसाद खानदेशात उमटले. विविध भिल नायक एकत्र येऊन त्यांनी इंग"जी सत्ता उलथून टाकण्यासाठी दीड हजारांवर आपली सेना उभारली. यासाठी पैसा व लष्करी साहित्याची निकड भासली. भीमा व काजी नाईकाने इंदूरकडून शिरपूर-धुळे मार्गे मुंबईस जाणारा 7 लाखांचा खजिना 17 नोव्हें. 1857 ला सेंधवा घाटात लुटला. 200 सैनिक (इंग्रज) व 300 भिल्लवीरांनी हल्ला करून खजिना लुटून इंग्रज सत्तेला हादरा दिला. याच वेळी 60 अफूने भरलेल्या गाड्याही लुटल्या.
अंबापाणीची लढाई - 11 एप्रिल 1858
सेंधवा घाटातून मुंबईस जाणारा व्यापारी व लष्करी मार्ग आदिवासी क्रांतिकारकांच्या ताब्यात राहणे इंग्रजांना परवडणारे नव्हते. डोंगरमाथ्यावर त्यांच्याशी लढणे शक्य नव्हते. भिल्ल सेना खाज्या नाईकच्या साथीदारांसह सातपुडा डोंगररांगांत अंबापाणी येथे आहे, असे इंग्रजांना कळल्यावर त्यांनी मोर्चा तिकडे वळवला. भिल्लवीरांनी दगड-गोट्यांनी डोंगरावरून मारा केला. इंग्रजांचे जबर नुकसान झाले. 2 अधिकारी, 16 इंग्रज सैनिक मारले गेले. 65 भिल्लवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. 170 जखमी झाले. खाजा नाईकाचा एकुलता एक मुलगा पौलद सिंग मारला गेला. आदिवासींना माघार घ्यावी लागली. या लढाईत 400 आदिवासी भिल्ल वीरांगणांनी भाग घेतला. 400 वीरांगणांना कैद केले. त्याच्यावर अमानुष अत्याचार केलेत. दौलत सिंगच्या सुनेला (ड्रम ट्रायल) लष्करी ढोल वाजवून ठार केले. खाजा नाईकला बिनशर्त माफी जाहीर केली, पण तो शरण आला नाही. पुढे त्याच्या अंगरक्षकाने फितुरी करून ठार मारले. 1867 मध्ये भीमा नाईकाने उठाव केला. तो पराभूत झाला. त्यास पकडून देशाबाहेर जन्मठेपेवर पाठवले.
आदिवासींचा या संघर्षात कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता. निस्वार्थी, अडाणी, असंघटित आदिवासींनी स्वराज्याकरिता लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात खान्देशातील (धुळे, नंदुरबार) आदिवासी वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्याच्या पराक्रमांची फारशी नोंद इतिहासाने घेतली नाही. याचे दुखि वाटते.
धुळे-नंदुरबार जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढा अतिशय रोमहर्षक आहे. स्वातंत्र्याच्या विविध आंदोलन पर्वात येथील जनतेने सक्रिय तन-मन-धनाने सहभाग घेतला. येथील जनतेस प्रोत्साहित करण्यासाठी व त्याच्या कार्याची दखल राष्ट्रीय नेत्यांनी घेतली. या भागातील लोकांना राष्ट्रीय आंदोलनात अधिक सकि"य करण्यासाठी त्यांनी भेटी दिल्यात. 1905 ला टिळक, 1921 महात्मा गांधी-नंदुरबार, 1926 महात्मा गांधी- धुळे-शिरपुरा-दोंडाईचा, 1927 सरदार पटेल, नेहरू 1940 क्रांतिवीर विनायक सावरकर, विनोबा भावे, राजेंद्रप्रसाद इत्यादी. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या विविध आंदोलनात येथील जनतेचा सकि"य सहभाग होता. 1936 ला राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे भरले त्यात येथील जनतेने सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय आंदोलनात येथील जनतेबरोबर लहान मुलांनीही सकि"य सहभाग घेतला. 9 सप्टेंबर 1942 शहीद शिरीषकुमार, नंदुरबार 1942 च्या लढ्याचे प्रतिसाद सर्वत्र उमटलेत. पण नंदुरबारच्या शिरीषकुमार व त्याच्या 5 बालवीरांचे हौतात्म्य महत्त्वाचे ठरले. 9 सप्टें. 1942 हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा व प्रत्येक भारतीयाची मान ताठ होऊन त्यास स्फूर्ती मिळावी असा ठरला. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात शिरीषकुमार व त्याच्या बालसाथीदारांनी समीधा अर्पण केल्यात. हा इंग्रज सरकारला जबरदस्त हादरा होता. या बालवीरांनी जाज्वल्य देश प्रेमाचा संदेश दिला.
या जिल्ह्यातील संस्थात्मक इतिहासही महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासातील या संस्थांचे कार्य राष्ट्रीयदृष्ट्या मोलाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1894 ला लो. टिळकांचे अनुयायी श्री. शंकर, श्रीकृष्ण देवांनी संपूर्ण भारतात विखुरलेले रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित साहित्य (पोथ्या, हस्तलिखिते) गोळा केले. संत साहित्याची व इतर अस्सल संदर्भ साधनांची जपणूक करण्यासाठी समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली. येथे शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, रामदास व त्यांचे शिष्य यांनी लिहिलेल्या हस्तलिखित पोथ्या व काही शिवकालीन घराण्याची अस्सल संदर्भ दुर्मिळ साधने, चित्रे, पुस्तके याचा मोठा अमूल्य संग्रह येथे आहे.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे प्राचीन ऐतिहासिक वास्तू, वस्तू, कागदपत्रे, दप्तरखाने, स्मारके, गडकोट किल्ले हे देशाचे महान प्रतीके असून तो देशाचा महान राष्ट्रीय वारसा आहे. त्याची जपणूक व संवर्धन करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. असा महान अनमोल राष्ट्रीय वारसा जपण्याचे व संवर्धन करण्याचे राष्ट्रीय काम धुळ्याचे राजवाडे संशोधन मंडळ करीत आहे.
भारतात इतिहास संशोधनासाठी स्थापन झालेल्या ज्या मोजक्या संस्था आहेत. त्यात राजवाडे संशोधन मंडळ हे महत्त्वपूर्ण आहे. मराठ्यांनी आपल्या पराक"माने, कर्तृत्वाने परकीय सत्तेशी जो लढा दिला. त्या मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी, तसेच त्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक प्रपंचावर सत्य प्रकाश टाकणारी हजारो अस्सल कागदपत्रे हस्तलिखित वतननामे महजर, नाणी, मुद्रा यासारखी महत्त्वाची ऐतिहासिक संदर्भ साधने इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पायपीट करून अहोरात्र परिश्रम घेऊन ती गोळा केली. ती मंडळात जमा आहेत. त्याशिवाय काही वर्षांत दहा हजार मोडी, मराठी, इंग्रजी, फारशी कागदपत्रे, नऊ हजार हस्तलिखिते तसेच नंदुरबार येथील इतिहास प्रसिद्ध कानुगो देसाई घराण्याची कागदपत्रे यांची भर पडली आहे. असं"य कागदपत्रे, हस्तलिखिते अप्रकाशित असून ती प्रकाशित करण्याचे काम संस्थेचे पदाधिकारी करीत आहेत. ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या साधनांच्या दृष्टिकोनातून ही संस्था महाराष्ट्राची नव्हे, तर भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक केंद्र मानली पाहिजे.
या संस्थेतील कागदपत्रे, हस्तलिखिते, पोथ्या याचा अभ्यास करण्यासाठी एम. फिल., पीएच. डी., डी. लीट करण्यासाठी भारतातून व परदेशातून अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्ती अभ्यासासाठी, संशोधनासाठी येथे येतात.
संस्थेतर्फे 80 वर्षांपासून "संशोधक' त्रैमासिक प्रकाशित होते. यात देश-विदेशातील संशोधकाने अभ्यासकांचे शोधनिबंध प्रकाशित होतात. संदर्भ ग्रंथालयात हजारो ग्रंथ संशोधनासाठी उपलब्ध आहेत. संस्थेचे भव्य वस्तुसंग"हालय आहे. त्यात 4/5 शतकापासूनच्या मूर्त्या, नाणी मुद्रा, ताम"पट, शिलालेख, शस्त्रे, चित्रे, पोथ्या अशी अनेक ऐतिहासिक अस्सल संदर्भ साधने आहेत. जागतिक वस्तुसंग"हालयाच्या यादीत याची गणना होते.
संस्थेने अनेक दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. मागच्या वर्षी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पटील यांच्या शुभहस्ते 15 दुर्मिळ ग्रंथाचे प्रकाशन संस्थेने केले. ही ग्रंथसंपदा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू म्हटली पाहिजे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात धुळे व नंदुरबार जिल्ह्याने प्राचीन काळापासून एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे हे येथे नमूद करावे लागेल. 

१९ टिप्पण्या:

  1. तळोद्यात बारगळ राज्यकर्ते होते ते मल्हारराव होळकरांचे मामा होते मल्हाररावांचे बालपण तळोद्यात गेले आपण त्याच्या कुठेच उल्लेख केलेला नाही

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तळोद्यात सुद्धा बारगळांची ऐतिहासिक गढी आज पण इतिहास सांगत उभी आहे

      हटवा
    2. तळोद्यात सुद्धा बारगळांची ऐतिहासिक गढी आज पण इतिहास सांगत उभी आहे

      हटवा
    3. होय त्या वारसाचा उल्लेख राहून गेलं आहे या साठी मला माफ करा ती गढी खान्देशातील समृद्ध वारसा आहे आणि अश्या आपल्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक गोष्टींचा यात समावेश नाही आहे तरी मी पुढील भागात त्याचा स्वतंत्र ब्लॉग लिहणार आहे . ब्लॉगवर भेट देण्यासाठी धन्यवाद 💐

      हटवा
  2. तळोद्यात बारगळ राज्यकर्ते होते ते मल्हारराव होळकरांचे मामा होते मल्हाररावांचे बालपण तळोद्यात गेले आपण त्याच्या कुठेच उल्लेख केलेला नाही

    उत्तर द्याहटवा
  3. होळकरांनी सुलतानपुर किल्ला हे लष्करी कवायती केंद्र म्हणुन विकसित केले होते तर सुभेदार मल्हारराव होळकर यांची जडन घडन तळोदा आणि तोरनामाळेत झाली होळकर रियासतीमध्ये किल्ले लळींग ला खुप महत्त्व होते

    उत्तर द्याहटवा
  4. मला माझ्या गावाचा इतिहास शोधाय चा आहे कुठे मिळेल

    उत्तर द्याहटवा
  5. सर मी किल्ला लळिंग धुळे च्या संवर्धन चे काम करतो किल्ला लळिंग धुळे चा पुर्ण इतीहास पाहीजे जसे किल्ला कोणता कालखंडात तयार झाला फारूकी राजवट च्या आधीच्या इतीहास पाहीजे 9922482351

    उत्तर द्याहटवा
  6. जळगाव जिल्ह्यातील यावल तहसिल मध्ये नायगाव आहे. ह्या गावात देशमुख, पाटील, चौधरी, मुलकी पाटील, व बलुतेदारांना वतने दिलेली आहेत. क्रपया नायगाव चे ऐतिहासिक महत्त्व विषद करावे. मो.नं.9923367877.

    उत्तर द्याहटवा